तासगाव परिसरात गव्यांचे दर्शन; वन विभागाने हुसकावले

Darshan of cows in Tasgaon area; Evicted by the Forest Department
Darshan of cows in Tasgaon area; Evicted by the Forest Department
Updated on

तासगाव : तासगाव शहरातील भिलवडी रस्ता, लांडघोल मळा, शिवाजीनगर परिसरात गवा रेडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाने त्याला हुसकावून लावले मात्र गवा एक होता की दोन याबद्दल मतभिन्नता आहे. दरम्यान या गव्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. 

गेल्या पंधरावड्यात मनेराजुरी परिसरात दोन गवे आढळून आले होते. त्यापाठोपाठ आज तासगाव शहराच्या बाहेरील भागात गवा आढळून आला त्यामुळे कळप चुकून बाहेर पडलेले गवे अद्याप याच भागात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुका वन अधिकारी कौसल्या भोसले यांच्यासह वनविभागाच्या पथकाने आज आढळून आलेल्या गव्या बाबत पडताळणी केली. शहराच्या पश्‍चिम भागातील भिलवडी रोड , शिवाजीनगर (खाडेवाडी) आज सकाळी काही शेतकऱयांना उसाच्या शेतात गवा आढळून आला. त्यानंतर काही वेळात भिलवडी रस्ता आणि लांडघोल मळा या भागात गवा आढळला. 

परिसरातील शेतकऱ्यांनी ग गवा रेडा हुसकावून। लावला. दुपारी तीन साडेतीन नंतर मात्र पुन्हा या गव्याचे दर्शन झाले नाही. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गवे दिसल्याने दोन गवे असल्याची चर्चा सुरू आहे. मनेराजुरी येथे एका वेळी दोन गवे आढळले होते. पंधरा दिवसांनंतर ते गवे पुन्हा कोठे दिसले नव्हते तेच हे गवे असावेत अशी चर्चा आहे. मात्र वन अधिकाऱ्यांनी मात्र हा दुसरा गवा असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com