गावोगावी येणाऱ्या लोककलावंताचे दर्शनही दुर्मिळ

Darshan of folk artists coming from village to village is also rare
Darshan of folk artists coming from village to village is also rare
Updated on

तुंग : कोरोना महामारीत एकमेकांच्या भेटीवर मर्यादा आल्या. गावोगावी येणाऱ्या लोककलावंताचे दर्शनही दुर्मिळ झाले. टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली. कोरोना आटोक्‍यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने व्यवहार थोडे थोडे पूर्ववत होताना दिसत आहेत. तुंग (ता.मिरज) येथे असाच एक वंशावळ सांगणारा हेळवी दिसला. पण पूर्वीसारखा त्यांच्याजवळ ना बैल...ना बैलगाडी. त्याऐवजी मोटरसायकलने येऊन वंशावळीची नोंद ठेवण्याची परंपरा जपताना सुरु होती जगण्याची धडपड. 

भीमराव राजाराम हेळवी (वय 55, रा. नागाव ता. तासगाव) असे त्या "मॉडर्न' हेळव्याचे नाव. धंद्याची ओळख म्हणून लाल शालीचा तुकडा खांद्यावर टाकून कापडी पिशवीतून वंशावळीच्या चोपड्या आणल्या होत्या. गावात घरा-घरात पूर्वीच्या रीतीप्रमाणे जमिनीवर बसूनच अठरा पिढ्यांचा इतिहास विशिष्ट लयीत कथन केला. घरातील कर्ती माणसेच कान देऊन ऐकत होती. लहान मुले मात्र उत्सुकतेपोटीसुध्दा वंशावळ ऐकायला थांबली नाहीत. 

मूळचे कर्नाटकातील हेळवी इथेच स्थिरावत आहेत. वंशावळीची माहिती तो एका मुलाकडे सुपूर्द करतोय. दुसरा मुलगा शिकून नोकरीच्या वाटा शोधतोय. पूर्वीचा हेळवी कोरोनामुळे बदललाय हे स्पष्ट करणारे हे चित्र. महामारी कसे जगायला शिकवते त्याचे हे मुर्तीमंत उदाहरणही. 

हायटेक जमान्यात अपडेट डाटा 
पूर्वी फेटा, पांढरा शर्ट, काळा कोट, धोतर अशा वेशात बैलावर बसून लाल शालीत गुंडाळलेली वंशावळीची चोपडी खांद्यावर मागे टाकून दिवस उगवायला दारात हजर व्हायचा. बैलगाडीने येऊन महिनाभर गावात मुक्काम करायचा. लोक नवीन नाव चोपडीत घातल्यावर खुशीने शेतात पिकेल ते धान्य द्यायचे. तांब्या पितळेची भांडी द्यायचे, एखादं जनावरं खुशीने द्यायचे. आज मात्र ती सुबत्ता, संपन्नता अभावानेच आढळते. आता प्रत्येक नाव समाविष्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. चोपडीही कालबाह्य होत असून नवी पिढी हायटेक बनत आहे. लॅपटॉप, आयपॅडवर अनेक पिढ्यांचा इतिहास व वंशावळीचा "डाटा' जतन केला जातो. प्रत्यक्ष भेटीऐवजी फोनवरुनच चौकशी करुन तो अपडेट केला जात आहे.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com