अंकलखोप : कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर श्री क्षेत्र औदुंबर - अंकलखोप (ता. पलुस) येथे मंगळवारी (ता.29 ) होणारी श्री दत्त जयंती उत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी दिली.

मार्च 2020 पासुन संपुर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार माजाविला होता. त्यामुळे संपुर्ण देशातील मंदीरे बंद होती. कोरोनाचा प्रसार कमी झाला दिवाळी पाडव्याला मंदीरे उघडण्यात आली. पण प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार 29 डिसेंबर रोजी होणारी औदुंबर येथिल श्री दत्त जयंती उत्सव भरवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे देवस्थान समितीने यंदाची यात्रा रद्द केली आहे.
तरी परगाव व परिसरातील भाविकांनी, व व्यापारी यांनी औदुंबर या तिर्थक्षेत्रावर विना कारण गर्दी करू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी घरातील श्री दत्त गुरूंच्या मुर्ती अथवा फोटोचे दर्शन घेऊन मनोभावे पुजा करावी. असे आवाहन देवास्थानच्या वतिने करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच अनिल विभुते, उपसरपंच विनय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अमर पाटील, सचिव धनाजी सुर्यवंशी, पुरुषोत्तम जोशी, सुरेश जोशी आदीसह सर्व संचालक, पुजारी मंडळी उपस्थित होते. देवस्थान समितीचे रवींद्र पाटील यांनी आभार मानले.
संपादन : प्रफुल्ल सुतार