
हुकूम मुलाणी
मंगळवेढा : मंगळवेढा नगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे घरपट्टी पाणीपट्टी व इतर करापोटी वसूल केलेली रक्कम नगरपालिकेच्या लेखा शाखेकडे न भरता परस्पर वापरून अपहर केल्याची बाब लेखापरीक्षणांमध्ये उघड होऊन सुद्धा संबंधित लिपिकावर कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे दत्तात्रय संदिपान इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीव्दारे कारवाईची मागणी केली.