बोरगावात दाऊनी, भुरीचा हल्ला; द्राक्षबागायतदार धास्तावले  

दिग्विजय साळुंखे
Monday, 30 November 2020

बदलेल्या हवामानामुळे हलक्‍या सरीमुळे बोरंगाव, निंबळक, राजापूर, लिंब, तुरची, आळते या भागातील शेतकरी दोन-तीन दिवसांच्या ढगाळ वातावरनामुळे हैराण झाला आहे.​

बोरंगाव : बदलेल्या हवामानामुळे हलक्‍या सरीमुळे बोरंगाव, निंबळक, राजापूर, लिंब, तुरची, आळते या भागातील शेतकरी दोन-तीन दिवसांच्या ढगाळ वातावरनामुळे हैराण झाला आहे. तीन - चार दिवसांपासून बोरंगाव परिसरात ढगाळ वातावरण झाल्याने द्राक्षबागावर दाऊनी, भुरी रोगांचा पादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार धास्तावले आहेत. 

बोरगाव परिसरात द्राक्ष क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पाऊसाने थैमान घातले यामुळे बोरगाव द्राक्ष पीक संकटात आले आहे. फुलोऱ्यातील द्राक्ष मण्याची गळती, रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी रात्र दिवस ट्रॅक्‍टर च्या साह्याने फवारणी करताना दिसत आहे. बागा वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारणी करताना दिसत आहेत. अवकाळी पाऊसाने द्राक्ष बागेत पाणी साचून राहिल्या मुळे वाढ खुंटली आहे. तर काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. बोरंगाव, आळते, तुरची, राजापूर, लिंब, तुरची या भागात द्राक्ष क्षेत्र जास्त प्रमाणात आहेत.

 आँगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात छाटणी केलेल्या बागा दावण्यांनी वाया गेल्या आहेत. ऑक्‍टोबर नंतर छाटणी घेण्यात आली होती. या बागा परतीच्या पाऊसात वाचल्या होत्या. मात्र आता दोन दिवसांपासून पुन्हा खराब हवामान असल्याने या बागांना दावण्यांचा विळखा पडला आहे. काही शेतकऱ्यांनी कशाबशा बागा रोगापासून वाचवल्या, अन्य शेतकऱ्यांचे द्राक्षबागा वाचवण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. 

द्राक्षवेलीच्या मुळाची वाढ थांबल्याने खोडावर मुळ्या फुटू लागल्या आहेत. रोगाला ओटोक्‍यात आणण्यासाठी आर्थिक पदरमोड करून काही शेतकऱ्यांना रोगापासून बागा वाचवणे शक्‍य झाले आहे. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बागाच सोडून दिल्याचे चित्र दिसत आहे. 

चालू वर्षी कोरोनाचे संकट, परतीच्या पाऊसाने द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततचे बदलते वातावरणामुळे द्राक्षबागेवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोग आटोक्‍यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना औषधा साठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 
- महादेव पाटील, द्राक्ष उत्पादक

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dauni, Bhuri attack in Borgaon; The vineyard growers panicked