सरकार पडेल म्हणणारे दिवास्वप्नात, मंत्री परब कोणाला म्हणाले...

सरकार पडेल म्हणणारे दिवास्वप्नात, मंत्री परब कोणाला म्हणाले...
Updated on

शिर्डी ः ""राज्यात पन्नास प्रमुख धार्मिक स्थळी एसटी डेपो उभारावेत, असा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला आहे. त्र्यंबकेश्‍वरपासून त्याची सुरवात करायची आहे,'' अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज येथे दिली. "महाआघाडीचे सरकार कोसळेल, हे भाकीत म्हणजे एक दिवास्वप्न आहे. ते पाहणाऱ्यांना आमच्या शुभेच्छा', असा चिमटा त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता काढला. 


परब यांनी आज येथे येऊन साईदर्शन घेतले. शिवसेनेचे सचिन कोते, संजय शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर आदी त्यांच्यासमवेत होते. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 
परब म्हणाले, ""शिवशाही बसचे अपघात अधिक होतात, हे लक्षात घेऊन या बस ठेकेदाराकडून एसटी महामंडळाला चालवायला घेता येतील का, या पर्यायाचा विचार सुरू आहे.'' एसटी महामंडळाच्या दोन हजार बसगाड्या निकामी झाल्या आहेत, असेही त्यांनी कबूल केले. रत्नागिरी रिफायनरीला शिवसेनेचा विरोध होता; मात्र त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली, हे वास्तव आहे. तो उत्पन्नाचादेखील भाग आहे, असे परब यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com