Accidental death : दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू
Ashta News : मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने अतुल चौगुले याने दुचाकीवरून (एमएच १०, डी के ८३९९) येत सुरेश कुराडे यांना पाठीमागून धडक दिली. डॉक्टरांनी कुराडे यांना तपासून उपचारांपूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले.
आष्टा : दुचाकीने दिलेल्या धडकेतील अंकलखोप (ता. पलूस) येथील जखमी सुरेश निवृत्ती कुराडे (वय ५० सुभाष नगर, कुराडे वस्ती, अंकलखोप, ता. पलूस) यांचा मृत्यू झाला आहे.