मृत्यू थांबेनात! सोलापुरातील मृत्यूची संख्या 250; मंगळवारी सापडले 18 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
मंगळवार, 30 जून 2020

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील अवघ्या 12 हजार 69 संशयित व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील रुग्णसंख्या दोन हजार 283; त्यापैकी 250 रुग्णांचा मृत्यू 
  • एक हजार 262 रुग्णांची कोरोनावर मात; 771 रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु 
  • संस्थात्मक विलगीकरण कक्षात सध्या आहेत 676 रुग्णांच्या संपर्कातील संशयित 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये 872 व्यक्‍ती; सात हजार 30 व्यक्‍तींचा पूर्ण झाला 14 दिवसांचा कालावधी 

सोलापूर : शहरात मंगळवारी (ता. 30) कोरोना पॉझिटिव्ह 18 रुग्णांची भर पडली. आता एकूण रुग्णांची संख्या दोन हजार 283 झाली असून त्यापैकी एक हजार 262 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सद्यस्थितीत विविध दवाखान्यांमध्ये 771 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे मात्र, मृत्यूची संख्या आता 250 झाली असून मंगळवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. 

शहरातील जुळे सोलापूर परिसरातील नरसिंग नगर, हैदराबाद रोडवरील जुना विडी घरकूल, रेल्वे लाईनमधील हार्टलॅण्ड अर्पाटमेंट, उमानगरी, दमाणी नगरातील सागर अर्पाटमेंट, महेश कोठे नगर, शेळगी, पश्‍चिम मंगळवार पेठ, बुधले गल्ली, मल्लिकार्जुन नगर, अक्‍कलकोट रोड, अशोक नगर, विजयपूर रोड, संजय नगर, कुमठा नाका, कलबल अर्पाटमेंट, मुरारजी पेठ, लोकमान्य नगर, विटा हेरिटेज, देगाव, नेहरूनगर, नवनाथ नगर, लक्ष्मीनारायण थिएटरजवळ, विजयपूर रोडवरील सुंदरम नगर आणि ईएसआय बिल्डींग हॉस्पिटल क्‍वार्टर येथे नवे 18 रुग्ण सापडले आहेत. 

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील अवघ्या 12 हजार 69 संशयित व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील रुग्णसंख्या दोन हजार 283; त्यापैकी 250 रुग्णांचा मृत्यू 
  • एक हजार 262 रुग्णांची कोरोनावर मात; 771 रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु 
  • संस्थात्मक विलगीकरण कक्षात सध्या आहेत 676 रुग्णांच्या संपर्कातील संशयित 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये 872 व्यक्‍ती; सात हजार 30 व्यक्‍तींचा पूर्ण झाला 14 दिवसांचा कालावधी 

शहरातील मृत्यूची संख्या 250 झाली 
मंगळवारी (ता. 30) शहरातील विजयपूर रोडवरील सुविद्या नगरातील 71 वर्षीय पुरुषाचा, दमाणी नगरातील सागर अर्पाटमेंटमधील 79 वर्षीय पुरुषाचा आणि भवानी पेठ परिसरातील 61 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील दोन रुग्ण 14 जूनला दवाखान्यात दाखल झाले होते, तर एक रुग्ण 20 जूनला दाखल झाला होता. शहरातील रुग्णांखी संख्या आता 250 झाली असून त्यामध्ये तब्बल 163 पुरुषांचा तर 87 महिलांचा समावेश आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death toll in Solapur is 250