कर्जमाफीत आता दोन्ही वर्षांतील ऊसही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

सातारा  : पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्यांना शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षांत लागवड झालेल्या उसाचाही समावेश करण्यात झाला आहे. त्यामुळे पूरग्रस्त लाभार्थ्यांना साधारण एक हेक्‍टरपर्यंतचे कर्जमाफ होताना साधारण एक लाख 30 हजारांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. कोणतेही कर्ज नसणाऱ्यांना नुकसानीच्या तिप्पट पैसे मिळणार आहेत. केंद्रीय समिती उद्या (गुरुवारी) नुकसानीची पाहणी करणार आहे. त्यानंतरच नेमकी लाभार्थी शेतकऱ्यांची आकडेवारी निश्‍चित होणार आहे. 

पूरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भरपाईची प्रतीक्षा आहे. त्यासाठी केंद्रीय समिती पाहणीसाठी येत आहे. या पाहणीनंतर नेमके लाभार्थी संख्या समजणार आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयात पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देताना या वर्षी लागवड झालेल्या उसालाच भरपाई मिळणार, असे म्हटले होते. मात्र, गेल्या वर्षी लागवड होऊन या वर्षी गळितासाठी आलेल्या उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे हे शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार होते. ही चूक लक्षात आल्याने शासनाने तातडीने शासन निर्णय बदलला. आता गेल्या वर्षी व यावर्षी असे दोन वर्षे लागवड झालेल्या आणि नुकसान झालेल्या उसाला भरपाई मिळणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कऱ्हाड, पाटण, सातारा तालुक्‍यांत नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागण आहे. हा ऊस पुरामुळे नुकसानग्रस्त झाला आहे. अशा पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्‍टरपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यातून साधारण एक लाख 30 हजारांपर्यंत लाभ मिळणार आहे. यासोबतच सर्व जिरायती पिके भरपाईत बसणार आहेत. जिरायती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही माफीचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही. अशा शेतकऱ्यांना नुकसानीच्या तिप्पट भरपाई मिळणार आहे. 

लाभार्थ्यांची होणार यादी 

उद्या (गुरुवारी) केंद्रीय समिती नुकसानीची पाहणी कऱ्हाड आणि पाटण तालुक्‍यांत करणार आहे. त्यानंतरच लाभार्थींची यादी जाहीर होईल. त्यामुळे शासनाच्या निकषानुसारच शेतीचे आणि मालमत्तेची नुकसानभरपाई मिळणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt-free now also for sugarcane of both years