
सांगली- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 76 हजार 27 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि विकास सोसायट्यामध्ये आज कर्जमुक्तीच्या याद्या झळकल्याची माहिती सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले. पहिल्या यादीत जिल्ह्यातील अवघ्या 596 शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढली होती. जिल्ह्याची दुसरी यादी जंम्बो असल्याने शेतकऱ्यांना अखेर कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला.
महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची योजना जाहीर केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी कर्जमाफीची यादी जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले होते. राज्यातील 15 हजार 358 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 24 फेब्रुवारीस जाहीर करण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महात्मा फुले कर्जमुक्तीची दुसरी यादी शनिवारी उशिरा प्रसिद्ध झाल्या. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले होते. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 90 हजार 107 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 528 कोटी रुपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील, असा अंदाज आहे. दुसऱ्या यादीत 76 हजार 27 शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली आहे. त्यांची रक्कम अद्याप समजलेली नाही. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संबंधित शाखेत लावल्या गेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली.
एखाद्या शेतकऱ्यांचे एक-दोन बॅंकामध्ये कर्ज आहे, मात्र ती रक्कम 2 लाखांच्या आतील आहे, त्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या यादीत जिल्ह्यातील अवघ्या दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे. म्हैसाळ (ता. मिरज) येथील 375 आणि बनपुरी (ता. आटपाडी) थकबाकीदार शेतकरी आहेत. पहिल्या यादीत कमी लाभार्थी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत 76 हजार 27 शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.