ग्रुड फ्रायडे, ईस्टरबाबत ख्रिस्त बांधवांचा हा झाला निर्णय

This is the decision of the Christian brothers on Good Friday, Easter
This is the decision of the Christian brothers on Good Friday, Easter
Updated on

नगर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. तरीही लोक मुद्दाम घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे काही भागात एसआरपीएफच्या तुकड्यांना पाचारण करावे लागते आहे. काही धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. त्यामुळे प्रादूर्भाव वाढतो आहे. मात्र, ख्रिस्ती बांधवांनी मोठा निर्णय घेतला आहे. गुड फ्रायडे व ईस्टर याबाबत हा निर्णय आहे.

नगर शहर ही मराठी ख्रिस्ती बांधवांची पंढरी समजली जाते. इंग्रजांच्या काळापासूनच ख्रिस्ती धर्मप्रसाराचे नगर हे महत्त्वाचे केंद्र आहे येथूनच रेव्हरंड ना.वा टिळक यांनी प्रभू येशू ख्रिस्तांचा संदर्भात भजने लिहिली. साथीच्या रोगाच्या वेळी याच ख्रिस्ती बांधवांनी मोठी सेवा केली. ईस्टर व गुड फ्रायडेबाबत पहिल्या मंडळीने हा निर्णय घेतला आहे.

आताचे कोरोनाचे संकटही भंयकर आहे. नगर जिल्ह्यात 26 कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जमाव बंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणीही घराबाहेर पडू नये असे आदेश नागरिकांना दिलेले आहेत. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांनी सर्व चर्च बंद ठेवले आहेत. त्यामुळे शहरातील चर्चमध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम होत नाहीत.

ख्रिस्ती बांधवांचे महत्त्वाचे समजले जाणारे गुड फ्रायडे हा सण शुक्रवार (ता. 10) व इस्टर हा सण रविवार (ता. 12) होणार आहेत. लॉकडाऊनच्या स्थितीमुळे हे सण ख्रिस्ती बांधवांनी घरीच साजरे करावेत, असे ख्रिस्ती धर्मगुरूंनी आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर संदेश प्रसारित

या सणांसाठी दिले जाणारे संदेश ख्रिस्ती धर्मगुरू युट्युबवर अपलोड करणार आहेत. हे संदेश युट्युब, फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहेत. हे संदेश ख्रिस्ती बांधवांनी घरीच भक्तिभावाने ऐकावेत, असे सांगण्यात आले आहे. 5 एप्रिल रोजी झावळ्यांच्या रविवार निमित्त असे धार्मिक संदेश प्रसारीत करण्यात आले होते. रेव्हरंड डॉ. सनी मिसाळ व रेव्हरंड संजय मिसाळ ही प्रभू येशू यांचा संदेश देणार आहेत.

गुरुवार (ता. 9) सायंकाळी सहा वाजता प्रभू भोजन संदर्भातील संदेश प्रसारित होईल. शुक्रवार (ता. 10) दुपारी बारा वाजता तीन तासांचा संदेश प्रसारित होईल. यात वधस्तंभावरील सप्तोच्चारवर अध्यात्मिक प्रवचन होईल. रविवार (ता. 12) ईस्टरवरील संदेश प्रसारित होईल. हा सर्व संदेश भाविकांनी घरीच भक्तिभावाने ऐकावा, असे आवाहन ख्रिस्ती धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com