
सांगली ः येत्या सात फेब्रुवारीला महापौर, उपमहापौरपद निवड होणार आहे. त्यासाठीच्या सत्ताधारी भाजपच्या इच्छुकांसह नगरसेवकांची कोअर कमिटीचे नेते खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आदींनी आज शासकीय निवासस्थानात बंद खोलीत स्वतंत्रपणे मते आजमावून चाचपणी केली. यावेळी महापौरपदासाठी सात, तर उपमहापौरपदासाठी चारजण इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. कोणत्याही प्रकारे गटबाजी उफाळून विरोधकांना संधी मिळू नये यासाठी कमालीची खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून आले.
त्यानुसार इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळवून संधीचा चेंडू त्यांच्या कोर्टात ढकलण्यात आला. चंद्रकांत पाटील पुन्हा शनिवारी (1 फेब्रुवारी) इच्छुक, नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. येत्या 3 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यापूर्वी त्यांच्याकडूनच नावे निश्चित करून कळविण्यात येणार आहे.
सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. बैठकीस संजय पाटील, सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष महापालिका नते शेखर इनामदार, नेते सुरेश आवटी, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मुन्ना कुरणे, गटनेते युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.
महापालिकेत भाजपचे 43, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे 35 संख्याबळ आहे. महापौर, उपमहापौर निवडीसाठी भाजपमधून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
दुसरीकडे राज्यात सत्तांतर होऊन विकास महाआघाडी सत्तेवर आली आहे. त्यामुळे विरोधक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्याही या निवडीत गटबाजीची संधी घेत दे-धक्का तंत्र अवलंबायच्या हालचाली सुरू आहेत. त्यादृष्टीने भाजपमधील नाराजीवर वॉच ठेवून व्यूहरचनाही सुरू आहे. त्यामुळे भाजपकडून कोणी नाराज होऊ नये याची खबरदारी घेतली आहे.
त्यानुसार आज संजय पाटील, गाडगीळ यांच्यासह नेत्यांनी इच्छुकांनी मते आजमावली. त्यामध्ये इच्छुकांना का संधी द्यायची, पाठबळ किती? याचीही चाचपणी केली. त्यानुसार 1 फेब्रुवारीस चंद्रकांत पाटील यांना नावे कळविण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. चंद्रकांत पाटील शनिवारी सांगली दौऱ्यावर असून, ते इच्छुकांसह नगरसेवकांशी संवाद साधणार साधणार आहेत. तरीही सदस्यांनी नावे निश्चित होत असताना नाराजी व्यक्त करू नये. सत्तेत असल्यामुळे भविष्यात प्रत्येकाला पदावर काम करण्याची संधी देण्या येईल, त्यामुळे कुणीही पक्षविरोधी कारवाई करू नये अशी सूचनाही देण्यात आली.
आता चंद्रकांत पाटील मते आजमावणार आहेत. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अर्ज भरण्यापूर्वी महापौर, उपमहापौर, पदासाठी नावे निश्चित करणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीकडे लक्ष लागून राहणार आहे.
इच्छुक
महापौरपदासाठी : गीता सुतार, उर्मिला बेलवलकर, सविता मदने, नसिमा नाईक, कल्पना कोळेकर, लक्ष्मी सरगर अनारकली कुरणे.
उपहापौरपदासाठी : राजेंद्र कुंभार, आनंदा देवमाने, प्रकाश ढंग, जगन्नाथ ठोकळे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.