आटपाडीत डाळिंबाच्या आवकेत घट, दरात वाढ; प्रतिकिलो 625 चा विक्रमी दर

नागेश गायकवाड
Friday, 20 November 2020

डाळिंबाची आवक कमी होत चालली असताना दरात मात्र वाढ होत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या सौद्यांत मंगलमूर्ती हॉट सप्लायरमध्ये प्रतिकिलो 625, सहाशे पाचशे, चारशे रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला. 

आटपाडी (जि. सांगली) : डाळिंबाची आवक कमी होत चालली असताना दरात मात्र वाढ होत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या सौद्यांत मंगलमूर्ती हॉट सप्लायरमध्ये प्रतिकिलो 625, सहाशे पाचशे, चारशे रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला. 

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्यामुळे डाळिंबाचा हंगाम सुरू होऊनही बाजारात डाळिंबाची आवक कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहे. दिवसेंदिवस आवकेत घट होत आहे. सांगोला, पंढरपूर, जत येथील बाजारात डाळिंबाचा सौदा दिवाळीमुळे बंद होता. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सौदेबाजार दिवाळीतही सुरू ठेवला होता. सर्व बाजार बंद असतानाही आटपाडीच्या बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली. त्यामुळे खरेदीसाठी व्यापाऱ्यांत स्पर्धा आणि चुरस लागली. 

पंढरीनाथ नागणे यांच्या मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर आडत दुकानात विक्रीसाठी आलेल्या पांडुरंग दत्तात्रय गायकवाड (चोपडे, ता. आटपाडी) यांच्या डाळिंबाला विक्रमी 625 रुपये तर दुसऱ्या दर्जाच्या डाळिंबाला सहाशे रुपये प्रति किलो भाव मिळाला. त्यांनी आणलेल्या सर्व डाळिंबाला सरासरी 157 रुपये दर मिळाला. 

सांगोला येथील नामदेव लक्ष्मण बंडगर यांच्या डाळिंबाला 425, सिद्धनाथ लक्ष्मण सरगर (नाझरे, ता. ता. सांगोला) यांच्या डाळिंबाला प्रति किलो 400 रुपये, तसेच मन्सूर शेख यांच्या डाळिंबाला 525 रुपये दर मिळाला. 

आटपाडीच्या बाजारात आवक कमी होत चालली आहे. व्यापारी बाहेरून मोठ्या प्रमाणावर आलेत. त्यांच्यात डाळिंब खरेदीसाठी मोठी चुरस लागली आहे. 

डाळिंबाला विक्रमी 625 रुपये दर

पांडुरंग दत्तात्रय गायकवाड यांनी दर्जेदार व मोठ्या आकाराची डाळिंबे आणली होती. आवक कमी व व्यापाऱ्यांतील चुरसीमुळे डाळिंबाला विक्रमी 625 रुपये असा दर मिळाला. 

- पंढरीनाथ नागणे, फ्रुट सप्लायर 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decline in pomegranate imports, increase in prices; Record rate of 625 per kg