तांत्रिक कारणास्तव कुपवाडमध्ये विलंबाने मतदानास प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

कुपवाड केंद्र 394 वरची मतदानाची प्रक्रिया विलंबाने सुरू झाली. कोणताही मतदार हा मतदाना वाचून वंचित रहाणार नसल्याचे केंद्र अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कुपवाड(सांगली) : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या येथील बुथ क्रमांक 235, कुपवाड 394 केंद्रावर उशिराने मतदान सुरु झाले. मतदानाची नियोजित वेळ ही मंगळवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 अशी होती. मात्र अचानक मतदाना अधिकारी बदलल्यामुळे स्वाक्षरीचा प्रश्न निर्माण झाला.

त्या जुळत नसल्याने हा विलंब झाल्याचा खुलासा करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायनिवाडा करीत मार्ग काढला. त्यामुळे काही काळ मतदारांची गैरसोय झाली. सकाळी आठ वाजून 35 मिनिटांनी मतदानास प्रारंभ झाला. 

कुपवाड केंद्र 394 वरची मतदानाची प्रक्रिया विलंबाने सुरू झाली. कोणताही मतदार हा मतदाना वाचून वंचित रहाणार नसल्याचे केंद्र अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

मतदान केंद्रावर काटेकोर व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टंसिंग मध्ये मतदानाला सुरुवात झाली. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता. "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने तपासणीसाठी पथक नेमले होते. ऑक्‍सिजन तपासणी केली जात होती. दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध होती. अशी जय्यत तयारी प्रथमच जाणवत होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delayed start of polling in Kupwad due to technical reasons