बोरगाव आरोग्य केंद्रात या डॉक्‍टरांच्या फेरनियुक्तीची मागणी...कोरोना रूग्ण वाढल्यामुळे नागरिकांत भिती

शामराव गावडे
Friday, 18 September 2020

नवेखेड (सांगली)- बोरगाव ता.वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या ठिकाणी पूर्वी असणारे डॉ संदीप कोडग यांची प्रतिनियुक्ती वर किंवा फेर नेमणूक करावी अशी मागणी बोरगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

नवेखेड (सांगली)- बोरगाव ता.वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या ठिकाणी पूर्वी असणारे डॉ संदीप कोडग यांची प्रतिनियुक्ती वर किंवा फेर नेमणूक करावी अशी मागणी बोरगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

बोरगाव सह नऊ गावासाठी असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. अलीकडील पंधरा दिवसात ही गावे कोरोनासाठी हॉट स्पॉट ठरत आहेत.फक्त बोरगाव मध्ये दोनशे लोक कोरोना पोसिटीव्ह आहेत तर आठ लोकांचा मृत्यू झाला.आहे.त्यामुळे येथील लोक खडबडून जागे झालेआहेत आरोग्यासाठी प्रत्येकजण दक्ष झाला आहे.

लोकांनी ऑक्सिजन मशीन खरेदी करून गावात तसेच आरोग्य केंद्रात वापरण्यास सुरवात केली आहे.या ठिकाणी दहा बेड चे कोविड सेंटर उभा करण्यासाठी जलसंपदा मंत्री यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.परंतु त्यासाठी डॉक्टर नसल्याने हे काम थांबले आहे.सध्या असणाऱ्या डॉ चेतना साळुंखे यांच्याकडे रेग्युलर पेशंट तसेच आयसोलेशन मधील रुग्ण यांची जबाबदारी आहे.त्यामुळे कोविड सेंटर मधील रुग्णाच्याकडे वेळ देता येणार नाही असे त्यांचे मत आहे.

जिल्हापरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांनी तात्काळ हे कोविड सेंटर सुरु करण्याच्या सूचना संबधित वैदकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.परंतु यंत्रणा ढिम्म आहे.या ठिकाणी पूर्वी सलग अकरा वर्षे काम केलेले डॉ संदीप कोडग हे स्थानिक डॉक्टर यांची मदत घेत हे कोविड सेंटर चालवतील अशी ग्रामस्थांची धारणा आहे.लोकांचा त्यांच्या कामावर विश्वास आहे.त्यासाठी जिल्हापरिषद सदस्य जितेंद्र पाटील,ग्रामपंचायत बोरगाव यांनी तशी मागणी जिल्हापरिषद कडे तर माजी सरपंच माणिकराव शामरावं पाटील,राजरामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील,संजय शिवाजीराव पाटील,पै विकास पाटील,पै विलास शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
मुख्य कार्यकरी अधिकारी जितेंद्र दुडी यांनी काल जिल्यातील 59 प्रथमिक आरोग्य केंद्रात 240 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या पर्शवभूमीवर बोरगाव ग्रामस्थयांच्या या मागणीला महत्व आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for re-appointment of these doctors in Borgaon Health Center