'महाराष्ट्र केसरी'च्या बाजीला चौदा लाखांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baji Bullock
'महाराष्ट्र केसरी'च्या बाजीला चौदा लाखांची मागणी

'महाराष्ट्र केसरी'च्या बाजीला चौदा लाखांची मागणी

कडेगाव - बैलगाडा शर्यतीवरील (Bullockcart Competition) निर्बंध हटवल्यानंतर बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत. सध्या देवराष्ट्रे (Devrashtre) येथील बाजी (Baji) जिथे शर्यतीला तिथे बाजी जिंकत आहे. 'महाराष्ट्र केसरी'चा मानही त्याने पटकवला आहे. बिनजोडचा बादशाह व मैदानातील 'हुकमी एक्का' म्हणून ओळख असणाऱ्या बाजीला चौदा लाख रूपयांची मागणी होत आहे. त्यामुळे बाजीचा कुतूहलाचा विषय ठरला आहे. 

बाजीचा रंग कोसा काळा आहे.  म्हैसुरी खिलार जातीचा देखना बांड बाजी एका वर्षाचा असताना देवराष्ट्रे येथील मोहन महिंद व बापुसो शिरतोडे यांनी 29 हजार रूपयाना खरेदी केला होता. सलग 52 वेळा बिनजोड़ शर्यत, तर मैदानात सलग 54 वेळा विजयी झाला आहे. वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या बाजीला बघण्यासाठी चाहता वर्गही मोठा आहे. रुपेश ड्रायव्हर याचे बाजीला ट्रेनिंग असते. त्यांचे बाजीला घडवण्यात मोलाचे योगदान आहे. बाजीचा वेद्यकीय खर्च प्रशांत जमदाडे करतात.

सांगली जिल्ह्यातील कोळे मैदानात बाजीने 'महाराष्ट्र केसरी'चा मान पटकवला आहे. मुंबईकरांना ही बाजीची भुरळ आहे. मुंबईकरांनी बाजीला 14 लाख रु. मागीतला होता. परंतु, ही ऑफर महिंद व शिरतोडे या दोघांनी नाकरली आहे. त्यांचा जीव बाजीत बसला आहे. कोट रुपये दिले तरी विकणार नाही असे दोघे सांगत आहेत. दररोज पोहणे व वीस मिनट रानात काम असा बाजीचा व्यायाम आहे. खाद्याचा रोजचा खर्च सातशे रुपये आहे. उडीद डाळ, शेंगदाणा पेंड, आटा असा आहार आहे .

शांत स्वभावाचा बाजी मैदानात गेल्यावर गुलाल घ्यायचा या ध्येयाने उतरतो. तसेच, बाजी आजपर्यंत ट्रँक फाँल एकदाही झालेला नाही. मैदानात उजव्या व डाव्या दोन्ही बाजुने तो सुसाट पळतो, बुजत नाही. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. बाजी हा मुंबईच्या मैदानात शर्यतीसाठी जातो. बैलगाडा शर्यतीत बाजीचे नाव गाजत आहे.

Web Title: Demand Rupees 14 Lakh For Maharashtra Kesari Baji Bullock

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..