सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार विश्वजित कदम यांनी रामापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याबाबतच्या पुढील कार्यवाहीबाबत व शासकीय परवानग्यांबाबत चर्चा केली.
कडेगाव : ‘‘तालुक्यातील रामापूर येथील शिवप्रेमी तरुणांनी गनिमी काव्याने ग्रामपंचायत (Ramapur Gram Panchayat) परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) उभारला होता. परंतु प्रशासनाने या पुतळ्याच्या उभारणीसाठी रीतसर परवानगी न घेतल्याचे कारण देत पोलिसांच्या हस्तक्षेपाने पुतळा काढून घेतला आणि प्रशासनाच्या ताब्यात घेतला.यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रामापूर येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत आता रीतसर परवानगी घेऊन प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय झाला आहे.