कोरोना रूग्णांवर मोफत उपचारासाठी भाजयुमोतर्फे सांगलीत निदर्शने 

घनशाम नवाथे
Tuesday, 4 August 2020

सांगली-  जिल्ह्यात खासगी रूग्णालयात कोरोना बाधितांवर महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात यावेत या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच फसवी घोषणा जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. 

सांगली-  जिल्ह्यात खासगी रूग्णालयात कोरोना बाधितांवर महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात यावेत या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच फसवी घोषणा जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. 

भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकात आयोजित आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष माने म्हणाले, ""राज्यातील सरकार एकीकडे कोरोना रूग्णांवर मोफत उपचाराची घोषणा करत आहे. परंतू प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. गोरगरीब रूग्णांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी लाखो रूपयांची बिले दिली जात आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत रूग्णांकडे उपचारासाठी पैसे नाहीत.

सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत उपचाराची केलेली घोषणा फसवी ठरली आहे. खासगी रूग्णालयामध्ये या योजनेचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे रूग्ण आणि नातेवाईक यांना धक्का बसला आहे. रूग्णांची अडवणूक केली जात आहे. शासकीय रूग्णालयातील खाटा भरल्याचे सांगून खासगी रूग्णालयात पाठवले जात आहे. योजनेतून रूग्णांवर उपचार न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.'' 

यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भर पावसात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. तसेच कोविड उपचाराबाबत शासनाने काढलेला अध्यादेश फाडून टाकण्यात आला. अश्रफ वांकर, राहुल माने, संतोष रूपनर, टायगर ग्रुपचे अध्यक्ष पिंटू माने, अक्षय पाटील, अमित भोसले, राजू जाधव, प्रथमेश वैद्य, युवती अध्यक्ष ज्योती कांबळे, चेतन माडगुळकर, प्रविण कुलकर्णी, सागर खंडागळे, सोहम जोशी, श्रीराम चव्हाण, ऋषी माने, राजू माने, शुभम माने, जगन्नाथ साळुंखे, प्रतीक पाटील, प्रथमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demonstrations by BJP for free treatment on corona patients