
ट्रॅप कॅमेऱ्यात बिबटया अभयारण्यात दिसला होता तेव्हा पासून नागरिकमध्ये भीतीचे वातावरण आहे.
देवराष्ट्रे (सांगली) : देशातील पहिले मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.गेल्या काही दिवसात या अभयरण्यत बिबटया आला आहे याची खात्री 21नोव्हेबर रोजी झाली. ट्रॅप कॅमेऱ्यात बिबटया अभयारण्यात दिसला होता तेव्हा पासून नागरिकमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा- कृषि विधेयकाच्या विरोधात बंदला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद -
सागरेश्वर अभयारण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास आसद येथील तरुणाना ताकारी योजनेच्या टप्पा क्र.2 येथील खोल ओढा येथे बिबट्या दिसला त्या तरुणानी नागरिकानी सावधानी घ्यावी यासाठी त्यानी सोशल मिडियावर संदेश व्ह्यरल केला यावर सागरेश्वर अभयरण्यातील वनपाल ,कर्मचारी बिबट्याच आहे का ठसे असतील तर ते कोणाचे आहेत हे पाहण्यासाठी गेले असता तेथील ठसे अस्पष्ट होते. याबाबत वन विभ अधिकारी विशाल माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी ठसे अस्पष्ट असल्याने असल्याने ते कुत्र्याचे आहेत की बिबट्याचे हे सांगता येत नाही असे सांगितले व नागरिकांनी सावधगिरी घ्यावी असे सांगितले.
संपादन- अर्चना बनगे