राजस्थानच्या 53 जणांची रवानगी निवारा कक्षात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

राजस्थानमधील काही रहिवासी रोजगाराच्या शोधात आंध्र प्रदेशामधील कडप्पा जिल्ह्यात गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली असताना ते सर्व जण आंध्र प्रदेशातून राजस्थानकडे निघाले होते.

नगर: राजस्थानमधील 53 जणांची रवानगी नगरमधील निवारा कक्षामध्ये करण्यात आली. रोजगाराच्या शोधार्थ ते आंध्र परदेशातील कडप्पा जिल्ह्यात गेले होते. कोरोनामुळे ते पुन्हा राजस्थानकडे निघाले होते. आज सकाळी नगर शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 
कोरोनामुळे देशात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश आहेत. नागरिकांसाठी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. 
राजस्थानमधील काही रहिवासी रोजगाराच्या शोधात आंध्र प्रदेशामधील कडप्पा जिल्ह्यात गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली असताना ते सर्व जण आंध्र प्रदेशातून राजस्थानकडे निघाले होते.

आंध्र प्रदेशातून तीन वाहनांतून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आणि सोलापूर रस्त्याने नगरकडे येत असताना पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची रवानगी निवारा कक्षात करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Departure of 53 people from Rajasthan in the shelter