esakal | निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बहारदार समाज प्रबोधन

बोलून बातमी शोधा

indurikar-maharaj.}
paschim-maharashtra
निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बहारदार समाज प्रबोधन
sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट - राष्ट्रीय किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या किर्तनाला उदंड प्रतिसाद मिळाला पाच हजार भक्तांची या कार्यंक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाचा शुभारंभ नगरसेवक चेतन नरोटे उद्योगपती रोहन लेंगडे, उद्योगपती आप्पा कापसे, तुळजापूर, वटवृक्ष देवस्थानचे मोहन पूजारी यांच्या हस्ते समर्थ पूजन आणि नंदादीप प्रज्वलीत करून करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. निवृत्ती महाराजांना श्री समर्थ प्रतिमा आणि कृपावस्ञ देवून अन्नछञ अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी सन्मानित केले.

निवृत्त महाराजानी संत तुकारामाच्या अभंगाचा संदर्भ देत अनेक उदाहरणे देत समाज प्रबोधन केले. हशा आणि टाळ्या यांच्या कल्लोळात समोजप्रबोधन केले.निवृत्ती महाराजांनी आई, वडील यांचा मुलांनी आणि त्यांच्या सुनांनी कसे वागावे याचे कीर्तनातून धडे दिले. आपली जायदाद व पैसे काही कामाचे नाहीत आपले समाधान हेच महत्वाचे आहे. या प्रसंगी वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे अन्नछत्र उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शाम मोरे जेष्ठ नेते सुरेश सुर्यवंशी, नगरसेवक उत्तम गायकवाड, राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप सिध्दे, व्यंकट मोरे, दत्ता जाधव, संजय इंगळे, अन्नछञ विश्वस्त अलकाताई भोसले, अनुया फुगे,अर्पिता भोसले, अनिता खोबरे, राजा निकम, सुरज निंबाळकर, सौरभ मोरे, धनराज शिंदे,विकास पवार, निखिल पाटील, आकाश शिंदे, रोहित निंबाळकर, विनायक भोसले, लखन सुरवसे, योगेश पवार, गोट्या माने, प्रवीण पोतदार, सनी सोनटक्के, प्रवीण बाबर, अनंत क्षिरसागर, टिल्या गंगणे, प्रवीण घाटगे, गणेश गंगणे, सागर शिंदे, बंडू पाटील ,प्रवीण देशमुख, मनोज निकम, सागर पवार, रोहित खोबरे, गणेश भोसले, टिनू पाटील, विनायक तोडकर आदींची उपस्थिती होती.