
मांगले (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालया शेजारी असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सात दुकान गाळ्यांचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. निधी असूनही ठेकेदार टोलवा टोलवी करीत आहे.
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालया शेजारी असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सात दुकान गाळ्यांचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. निधी असूनही ठेकेदार टोलवा टोलवी करीत आहे. काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे अडगळीत पडल्यासारखे चित्र सध्या दिसत आहे.
दहा ते पंधरा वर्षांपासून दोन ठेकेदार या बांधकामासाठी झाले आहेत, एका ठेकेदाराचा आकस्मित मृत्यू झाल्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराला काम दिले आहे, मात्र तो टोलवाटोलवी करीत आहे, दोन महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराला बोलावून घेऊन गाळे धारकांच्या समोर उभा करण्यात आले होते. त्यावेळी आठ दिवसांत काम सुरू करण्याचे त्याने कबूल केले होते; मात्र दोन महिने होऊन गेले तरी ठेकेदार फिरकलेला नाही. त्याला काही रक्कम ऍडव्हान्स म्हणून दिली आहे. एका वर्षी फाऊंडेशन, एका वर्षी पिलर असे, एका वर्षी भिंती असे एका का वर्षात काम झाले आहे. स्लॅब, शटर आणि अंतर्गत कामे गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहेत. 14 व्या वित्त आयोगातून खर्च करण्यात आला
आहे.
सुमारे सहा लाख रुपये यासाठी तरतूद करण्यात आली आहे. अपूर्ण अवस्थेतच असणाऱ्या या दुकान गाळ्यांचे बुकिंग अगोदरच केले गेले आहे. काही गाळेधारकांनी त्यासाठी अनामत रक्कम भरून बुकिंग केले आहे. मात्र गाळ्यांचे बांधकाम पूर्ण कधी होणार हे ना प्रशासनाला माहीत ना गाळेधारकांना ही माहिती नाही. ग्रामपंचायतीच्या समोर पूर्वेच्या बाजूचे दुकान गाळे पूर्ण होऊन त्या ठिकाणी गाळेधारकांनी व्यवसाय सुरू केले आहेत; मात्र दक्षिण बाजूच्या या दुकान गाळ्यांना कधी मुहूर्त मिळणार हे समजू शकत नाही. ग्रामपंचायत आत्तापर्यंत चार वेळ ग्रामपंचायतीचे कारभारी बदलले; मात्र दुकान गाळ्यांच्या अपूर्ण बांधकामाची समस्या सुटलेली नाही.
उपसरपंच एका ठेकेदाराचा आकस्मित मृत्यू झाल्यामुळे काम रखडले आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता दुसऱ्या ठेकेदाराला काम दिले आहे. त्याचे अन्य ठिकाणी काम सुरू असल्याचे तो सांगत आहे. मात्र, आम्ही गेल्या महिन्यात पाठपुरावा करून काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला समज दिली आहे. येत्या आठवड्या भरात कामाला सुरवात होईल.
- धनाजी नरुटे, उपसरपंच
संपादन : प्रफुल्ल सुतार