मुस्लीम बांधवांचा विटा शहर स्वच्छतेचा निर्धार : ईद निमित्त बैठक...अव्वल क्रमांकासाठी प्रयत्न करणार

गजानन बाबर 
Friday, 30 October 2020

विटा(जि. सांगली)-  मानवतेचे मार्गदर्शक व ज्ञानाचे प्रणेते पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या विचारांचा आदर्श घेऊन "स्वच्छतेत मंत्र स्वीकारून' अभियान व स्वच्छता श्रमदानात सहभागी होण्याचा निर्णय मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे. 

विटा(जि. सांगली)-  मानवतेचे मार्गदर्शक व ज्ञानाचे प्रणेते पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या विचारांचा आदर्श घेऊन "स्वच्छतेत मंत्र स्वीकारून' अभियान व स्वच्छता श्रमदानात सहभागी होण्याचा निर्णय मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे. 

ईद -ए -मिलादच्या निमित्त येथील मुस्लिम बांधवांनी स्वच्छ सर्वेक्षण 21 अंतर्गत विटा नगरपालिकेच्या विद्यमाने स्वच्छता जनजागृती सभा घेत स्वच्छ सर्वेक्षण आता देशपातळीवर ती अव्वल क्रमांक येण्याचा निर्धार केला. मुल्ला गल्ली येथील जुम्मा मस्जिद ट्रस्टच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र करून कोरोना पार्श्वभूमीवर नियम पाळून सभा घेण्यात आली. 

यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले, "या स्वच्छ सर्वेक्षण चळवळीमध्ये आपण यापुढे महत्वपूर्ण योगदान द्यावे.कचरा विलगीकरण हे फार महत्वाचे आहे. आपण ओला-सुका व घरगुती घातक असे वर्गीकरण करून कचरा घंटागाडी द्यावा तसेच प्लास्टिक बंदी नियमाचे पालन करावे.परिसरामध्ये उघड्यावर कचरा पडू नये यासाठी आपण सर्वांनी आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा.पालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावे."

जुम्मा मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष हाजी मुस्ताक हुसेन मुल्ला म्हणाले, "मुस्लिम समाज विटा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल.मुल्ला गल्ली परिसरात तसेच मस्जिद परिसरात दररोज नित्य स्वच्छता ठेवून आम्ही या मोहिमेमध्ये सर्वतोपरी योगदान देऊ. आम्ही दररोज वेगवेगळ्या कचरा घंटागाडीत देत आहोत आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून व समाजाच्या वतीने शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आवश्‍यक ते सर्व योगदान देणार.

यावेळी फिरोज तांबोळी,नगरसेवक सुभाष भिंगारदेवे आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याधिकारी अतुल पाटील जुम्मा मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष हाजी मुस्ताक हुसेन मुल्ला,असफअली शिकलगार,असलम पटेल,युन्नुस तांबोळी,हारुण नदाफ, मुख्तार शिकलगार,जहिरआब्बास मुल्ला,परवेज तांबोळी, हाजी ताहेरअली शिकलगार,रोहीत पवार,केदार जावीर उपस्थित होते.प्रास्ताविक नितीन चंदनशिवे यांनी केले, आभार असलम शेख यांनी मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Determination of cleanliness of Vita city of Muslim brothers: Meeting on the occasion of Eid