
सांगली : ‘‘दिव्यांगांसाठीचे शासनाचे धोरण सकारात्मक, सर्वसमावेशक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची कोणतीही भावना न ठेवता समाजात आत्मविश्वासाने वावरावे. त्यांची बुद्धिमत्ता व कलागुण विकसित करण्यासाठी पालक व शाळांनी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले.