CM Devendra Fadnavis : नशेखोरीत पोलिस आढळल्यास बडतर्फ; फडणवीस यांचा इशारा, सांगलीत पोलिस मुख्यालयाचे लोकार्पण
Sangli News : राज्यात अमली पदार्थांवरील कारवाईस कठोर दिशा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत पोलिसांना इशारा दिला. नशेखोरीत पोलिस दोषी आढळल्यास थेट बडतर्फी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सांगली : ‘‘जिल्ह्यात नशेखोरीविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात कोणी पोलिस अधिकारी वा अंमलदाराचा सहभाग आढळल्यास त्याला आता निलंबित नव्हे, तर थेट बडतर्फ केले जाईल,’’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.