दुचाकीवरून पडल्याने माणगावातील भाविकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balaram Dhing

वीरभद्र देवाच्या दर्शनासाठी दुचाकीवरून मागे बसून येत असलेल्या माणगाव (ता. चंदगड) येथील भाविकाचा पडल्याने मृत्यू झाला.

दुचाकीवरून पडल्याने माणगावातील भाविकाचा मृत्यू

- तात्यासाहेब कामत

मांजरी - येडूर (ता. चिक्कोडी) येथील वीरभद्र देवाच्या दर्शनासाठी दुचाकीवरून (Two Wheeler) मागे बसून येत असलेल्या माणगाव (ता. चंदगड) येथील भाविकाचा (Devotee) पडल्याने मृत्यू (Death) झाला. चिक्कोडी-मिरज रस्त्यावरील सिद्धापूरवाडी गावानजीक गुरूवारी (ता. १७) ही घटना घडली. बाळाराम बसवाणी धिंग (वय 62) असे मयताचे नाव आहे. अंकली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, माणगाव (ता. चंदगड) येथील बाळाराम बसवाणी धिंग हे गुरूवारी (ता. १७) दुचाकीवर (एमएच ०९ ईआर ६११९) मागे बसून येडूर येथील वीरभद्र देवाच्या दर्शनासाठी निघाले होते. सायंकाळी चिक्कोडी-मिरज रस्त्यावरील सिद्धापूरवाडी गावानजीक आले असता दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी बाळाराम धिंग हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. उपचारासाठी त्यांना तातडीने चिक्कोडी येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत असतानाच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच अंकली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्रभारी उपनिरीक्षक भरतगौडा, अनिल कुमार व सहकाऱयांनी पंचनामा घटनेचा पंचनामा केला. चिक्कोडी रूग्णालयात शुक्रवारी (ता. १८) शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. माणगाव (ता. चंदगड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद अंकली पोलिस स्थानकात झाली आहे. बाळाराम धिंग यांचा माणगाव येथे टेलरिंग व्यवसाय होता. `सकाळ` बेळगाव आवृत्तीचे प्रमुख मल्लिकार्जुन मुगळी यांचे ते भाऊजी होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.