नगर तालुका ः अवतार मेहेरबाबा यांची "बिगीन दि बिगीन' ही धून पावणेबारा वाजता वाजवण्यात आली. नंतर नगरच्या भाविकांनी त्याची पुनरावृत्ती केली. दुपारी बारा वाजता मौनास सुरुवात झाली.
यावेळी सर्वत्र शांतता होती. टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होते. पंधरा मिनिटानंतर अवतार मेहेर बाबा की जयच्या जयघोषात मौन सोडण्यात आले. यावेळी टेकडीवर सुमारे हजाराच्यावर भाविक होते.
51 वी अमरतिथी सोहळा
अवतार मेहेरबाबाच्या समाधी स्थळी 51 वी अमरतिथी सोहळा साजरा करण्यात आला. आज 31 जानेवारीला बाबांनी देहत्याग केला. त्यावेळी दुपारी बारा वाजता दौंड रोडवरील मेहराबाद (अरणगाव)येथे सुमारे हजार भाविकाचे मौन पाळले. जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले.
काल गुरूवारपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप थाटला आहे. त्याव्यतिरिक्त जेथे मिळेल भाविक बसून होते दुपारी साडेअकराला ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मेहेरनाथ कलचुरी,रमेश जंगले,श्री थाडे बंधू आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
70 देशातून लाखावर मेहेरप्रेमी
अवतार मेहेरबाबांनी मौनास सुरवात केल्यावर शेवटपर्यंत मौन पाळले म्हणून आज हे महामौन पाळले जाते. आज सकाळी 7 वाजता मुख्य मंडपात प्रेममिलन कार्यक्रम सुरु झाला. तो रात्री उशिरापर्यत चालू होता. आजही समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या. जगातील 70 देशातून व भारतातून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत. तर परदेशातील 350 भाविक आले आहेत. कोठेही गडबड,गोंधळ नव्हता. रात्री उशिरा पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता त्यात देश-विदेशातील मेहेरप्रेमीनी
भाविक स्वयंसेवक
भजने, जल, नृत्ये, कव्वाली, गाणे, नाटिका सादर केल्या .पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमणावर आहे.अनेक उपहारगृहे, प्रसादाची दुकाने, बाबांची फोटो, किचेन आदी विविध वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. यातील भाविक स्वयंसेवकाचे काम करीत आहेत .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.