यंदा दानपेटीत परदेशी चलनी नोटा देखील सापडल्या आहेत. त्यात भूतान देशाचे ५ नोंग्त्रुय (भारतीय चलनात पाच रुपये) व नेपाळ देशाचे ५ रुपये (भारतीय चलनात ३ रुपये) अशा परकीय चलनाचा समावेश आहे.
बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या (Saundatti Renuka Devi Temple) दानपेटीत ७८ लाख ५४ हजार रुपये देणगी जमा झाली आहे. दरम्यान, दानपेटीत भाविकांकडून विदेशी चलनी नोटादेखील अर्पण करण्यात आल्या आहेत. यामध्ये भूतान आणि नेपाळच्या चलनी नोटांचाही (Bhutan Nepal Currency Notes) समावेश आहे.