Sangli News : धडक एवढी जोरदार होती की, अनिल सरडे जागीच ठार झाले. जखमी धनाजी यादव यांना उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मोटार व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली.
"Tragic accident at Gatadwadi junction claims two lives as devotees were headed for a temple visit."Sakal
आष्टा : देवदर्शनासाठी निघालेल्या येथील दोघांवर काळाने घाला घातला. मोटार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. गाताडवाडी फट्यावर अपघात झाला.