
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या रेणावी (ता. खानापूर) येथील श्री रेवणसिद्ध मंदिरात भक्तांची वर्दळ सुरु झाली आहे.
विटा : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या रेणावी (ता. खानापूर) येथील श्री रेवणसिद्ध मंदिरात भक्तांची वर्दळ सुरु झाली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक ती सर्व काळजी घेऊन रेणावी ग्रामस्थ, मानकरी,मंदिराचे विश्वस्त, पुजारी यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दर्शन घेण्यासाठी भक्तांनी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन श्री रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी केले आहे.
गुरव म्हणाले, "शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे संपूर्ण मंदिर व परिसराची स्वच्छता केली. मंदिरात प्रवेश करतेवेळी प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे.थर्मल स्कॅनिंग व ऑक्सीमीटर द्वारे तपासणी केली जात आहे. योग्य ठिकाणी सॅनिटायझरचा वापर,दर्शन बारीमध्ये सोशल डिस्टंसिंगचे चौकोन आखून अंमलबजावणी सुरू आहे.
जनजागृती साठी भित्तीपत्रके,डिजिटल बोर्ड तसेच आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.गर्दीच्या वेळी स्पीकर वरून भाविकांना आव्हान करण्यात येत आहे. देवस्थानच्या वतीने शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते आहे. आमदार अनिल बाबर यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व भक्तांनी गेल्या आठ दिवसात दर्शनासाठी उपस्थिती लावली व मंदिरातील सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
संपादन : प्रफुल्ल सुतार