

Angarki Sankashti Draws Massive Devotion at Sangli Ganpati Temple
Sakal
सांगली: ‘देवा गणराया, नवीन वर्षात आरोग्य, सुख-समाधान लाभो, सगळी स्वप्ने पूर्ण होवोत,’ असे साकडे भाविकांनी आज अंगारकी संकष्टीनिमित्त गणरायाला घातले. सांगलीतील गणपती पंचायतन मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त अलोट गर्दी झाली होती. गणपती पेठेत दूरवर रांगा लागल्या होत्या.