सांगलीच्या दत्तात्रयला मदतीचा हात; राज्यमंत्र्यांनी केले कौतुक

विशेष म्हणजे दत्तात्रय यांचे शिक्षण ही झाले नाही तरीही त्यानी चारचाकी जिप्सी बनवली.
सांगलीच्या दत्तात्रयला मदतीचा हात; राज्यमंत्र्यांनी केले कौतुक
Updated on

देवराष्ट्रे - यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमितील दत्तात्रय लोहार यानी मिनी जिप्सी तयार केली आहे. सध्या या मिनी जिप्सीची सर्वत्र चर्चा आहे. या मिनी जिप्सिची अजुन बरीच कामे करायची आहेत. त्यासाठी मदत करावी अशी मागणी केली होती. दत्तात्रय लोहार यानी दैनिक 'सकाळ'ला मुलाखतीत सांगितले होते. यावर कृषिराज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यानी दत्तात्रय लोहार यांना सत्तर हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे.

सांगलीच्या दत्तात्रयला मदतीचा हात; राज्यमंत्र्यांनी केले कौतुक
देवराष्ट्रेतील दत्तात्रयच्या कारनाम्यावर 'महिंद्रा' फिदा

राज्यमंत्री कदम म्हणाले, माझ्या मतदार संघातील व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमितील दत्तात्रय लोहार यानी मिनी जिप्सी बनवली आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. विशेष म्हणजे दत्तात्रय यांचे शिक्षण ही झाले नाही तरीही त्यानी चारचाकी जिप्सी बनवली. मुलाने हट्ट केला की आपल्या घरात चारचाकी गाडी हवी यावर दत्तात्रय यानी मिनी जिप्सी तयार केली. यासाठी कुटुंबातील सर्वानी कष्ट घेतले. अशा दत्तात्रय लोहार याचा आजच्या तरुण पिढीने आदर्श घ्यावा व दत्तात्रय लोहार यास लागेल ती मदत करण्याचे कदम यांनी सांगितले.

तसेच देवराष्ट्रे ग्रामस्थकडून दत्तात्रय याचा सत्कार आणि आर्थिक मदत करण्यात आली यावेळी सरपंच प्रकाश मोरे, प्रमोद गावडे, राहुल मोहिते, संदीप मिसाळ, दिलीप जाधव, दिनकर पवार, प्रमोद महिद, सुभाष शिरतोडे, आत्माराम ठोंबरे, ग्रामविकसाधिकारी उत्तम पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सांगलीच्या दत्तात्रयला मदतीचा हात; राज्यमंत्र्यांनी केले कौतुक
कॉंग्रेस-राष्ट्रवादी, सेनेचे उमेदवार ठरवणार असतील तर चालणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli clinic medical negligence news
Fake Babas Maharashtra
wildlife migration in Sangli forest area
how heirs apply for PM Kisan after death
Marathi News Esakal
www.esakal.com