धनगर आरक्षणप्रश्‍नी सरकार कुंभकर्ण : गोपीचंद पडळकर... शुक्रवारी राज्यभर "ढोल वाजवा' आंदोलन 

अजित झळके
Tuesday, 22 September 2020

सांगली-  धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्‍नावर ठाकरे सरकार झोपलेले आहे. कुंभकर्ण दहा महिने झोपायचा, या सरकारला दहा महिन्यात जाग आलेली नाही. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी शुक्रवारी (ता. 25) राज्यात जागोजागी "ढोल वाजवा, सरकारला जागवा' आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

सांगली-  धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्‍नावर ठाकरे सरकार झोपलेले आहे. कुंभकर्ण दहा महिने झोपायचा, या सरकारला दहा महिन्यात जाग आलेली नाही. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी शुक्रवारी (ता. 25) राज्यात जागोजागी "ढोल वाजवा, सरकारला जागवा' आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

हे आंदोलन थांबवायचे असेल तर राज्य सरकारने धनगर समाज आरक्षण प्रश्‍नावर लढणाऱ्या समाजातील नेत्यांशी तत्काळ चर्चा करावी आणि मार्ग काढावा, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले, ""धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने, मोर्चे, मेळावे, लाखोंच्या सभा झाल्या. समाज नेहमीच आक्रमकपणे मागणी करतोय. हे सरकार मात्र त्यावर गेल्या दहा महिन्यात चकार शब्द बोलत नाही. कुंभकर्ण सहा महिने धोपायचा, हे दहा महिने झोपलेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना त्यांनी चर्चेचे मार्ग खुले ठेवले. चर्चेतून धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले. ज्या सवलती आदिवासींना त्याच धनगर समाजाला लागू केल्या. अर्थसंकल्पात पाचशे कोटीची तरतूद केली. तो निधी, त्या योजना ठाकरे सरकारने गुंडाळून ठेवल्या. त्यात धनगर विद्यार्थ्यांना अनेक सवलतींचा समावेश होता. समाजात त्याबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्या योजना तातडीने लागू कराव्यात.'' 

ते म्हणाले, ""गेल्या पाच वर्षात विरोधी बाकावर असलेले नेते धनगर आरक्षणावर बोलत होते. अधिवेशनाला धनगरी पेहराव करून येत होते. आता सत्तेत आल्यावर का गप्प बसलेत? त्यांना धनगर समाजाचे काही देणेघेणे नाही. त्यामुळे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी शुक्रवारी समाजबांधव गावागांवत ढोल वाजवून आंदोलन करतील. मंदिरे, नगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणी हे आंदोलन होईल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar reservation issue on Friday "Dhol Wajwa 'agitation across the state