सोपलांची रिटायरमेंटची वेळ आली जवळ? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

सोलापूर : जिल्ह्याच्या राजकारणात नुकतीच मोठी राजकीय उलथापालथ झालेली आहे, त्यात दिलीप सोपल, दिलीप माने आणि रश्मी बागल यांनी शिवबंधन हातात बांधलंय. 

महाजानदेश यात्रेमुळे भाजपने जिल्ह्यात भलं मोठ्ठ शक्ती प्रदर्शन केलं. त्यात शिवसेनाही मागे राहताना दिसत नाहीये, 'निर्धार शिवशाहीचा' हा हुतात्मा स्मृतीला मेळावा घेऊन त्यांनी आजी आणि माजी शिवसैनिकांचा मनोमिलन करून आणलं. 

दरम्यान, आपल्या वेगळ्या ढंगाच्या भाषण शैलीने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी लवकरच रिटायरमेंट जवळ आल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, सोपलांची ही आठवी निवडणूक, प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या चिन्हावर लढवण्याचा त्यांचा अनुभव, मात्र पुढचीही निवडणूक लढवण्याकरिता माझ्यामध्ये गणपतराव देशमुख यांच्या एवढ सामर्थ्य आणि ऊर्जा नाही असं म्हणून त्यांनी रिटायरमेंट जवळ आल्याचे संकेत दिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Sopal may be retired after assembly election