दीपोत्सवाच्या मंद प्रकाशात उजळतेय मंगसुळीचे खंडोबा मंदिर | Khandoba Mandir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपोत्सवाच्या मंद प्रकाशात उजळतेय मंगसुळीचे खंडोबा मंदिर

दीपोत्सवाच्या मंद प्रकाशात उजळतेय मंगसुळीचे खंडोबा मंदिर

sakal_logo
By
रंगनाथ देशिंगकर

उगार खुर्द - पाच नोव्हेंबरपासून कार्तिक दीपोत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे कागवाड तालुक्यासह विविध परिसरातील मंदिरात कार्तिक दीपोत्सव सुरू आहे. दीपोत्सवात पणत्यांच्या मंद प्रकाशात १२ खंडोबा देवस्थानांपैकी एक असलेले मंगसुळीचे खंडोबा मंदिर उजळून जात आहे. त्यामुळे देव दर्शनासह दीपोत्सवासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिक दीपोत्सव मर्यादित होता. आता कोरोना संक्रमण कमी झालेले असून प्रतिबंधात्मक नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे कार्तिक दीपोत्सवास भाविक गर्दी करत आहेत. ज्यांचा दीपोत्सव असतो, त्यांच्यासोबत नातेवाईक व स्नेही येत आहेत. येत्या ४ डिसेंबरअखेर कार्तिक दीपोत्सव चालणार आहे. या कार्यक्रमामुळे सायंकाळपासून मंदिर उजळून निघत आहे. यावेळी आरतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.

loading image
go to top