Special Inspector General of Police ranjankumar sharma
sakal
सांगली - खून, दरोड्यासह गंभीर गुन्ह्यात अधिकारी, अंमलदारांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांचे थेट निलंबन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. सांगली गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी गुंडाविरोधी पथकासह ठोस ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. तसेच दृष्य पोलिसिंगवर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.