जेष्ठ नागरिकांसाठी शिवशाहीच्या दरात १ जून पासून सवलत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

अक्कलकोट - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नव्याने सुरू केलेल्या वातानुकूलित शिवशाही बसमध्ये जेष्ठ नागरिकांना सवलतीतून प्रवास देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जेष्ठ नागरिकांकडून स्वागत होत आहे. 

अक्कलकोट - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नव्याने सुरू केलेल्या वातानुकूलित शिवशाही बसमध्ये जेष्ठ नागरिकांना सवलतीतून प्रवास देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जेष्ठ नागरिकांकडून स्वागत होत आहे. 

एस.टीच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन महामंडळाने खास जेष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून  दिली आहे. सध्या एस.टीच्या साध्या, रातराणी व निमआराम बसमधून ज्येष्ठनागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत मिळते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरु झालेल्या शिवशाही बसेसमध्ये सुद्धा मिळावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ  नागरिकांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्याची दखल  घेऊन मंत्री रावते यांनी याबाबत प्रशासनास प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार सध्या राज्यात सुरु असलेल्या वातानुकूलित शिवशाही आसन श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान  श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १ जूनला एस.टीचा ७० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ही सवलत राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना मिळणार आहे.

Web Title: Discounts from Jun 1 for senior citizens in shivshahi bus rate