सदस्य निवडीसाठी आयुक्‍तांशी चर्चा, प्रशासकीय गुंता वाढला 

 Discussion with the Commissioner for the selection of the members
Discussion with the Commissioner for the selection of the members
Updated on

नगर : महापालिकेच्या स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य निवड करण्याच्या प्रस्तावावर व मागील आठ सदस्यांच्या निवृत्ती प्रस्तावावर स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनी अजूनही स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी नगरसचिव एस. बी. तडवी यांनी आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत स्थायी समितीतील सदस्य निवडीच्या प्रशासकीय पेचावर आयुक्‍तांसोबत चर्चा करण्याचा निर्णय झाला.

या बैठकीला नगरसचिव एस. बी. तडवी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, सचिन जाधव, सतीश शिंदे उपस्थित होते. या बैठकीला बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे गटनेते अनुपस्थित होते.

जानेवारी महिन्याच्या शेवटी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात निवृत्त सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या निवृत्त सदस्यांमध्ये संध्या पवार (कॉंग्रेस), विद्या खैरे, ज्ञानेश्‍वर येवले, गणेश कवडे (शिवसेना), दीपाली बारस्कर, अविनाश घुले, शोभा बोरकर (राष्ट्रवादी), मनोज कोतकर (भाजप) यांचा समावेश होता.

या संदर्भातील पत्र सभापतींच्या स्वाक्षरीविनाच 4 मार्चला महापौरांकडे देण्यात आले होते. स्थायी समिती सदस्य निवृत्ती व नवीन सदस्य निवडीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडून तयार करून स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख यांच्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावावर अजूनही सभापती शेख यांनी स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे स्थायी समितीतील नवीन सदस्य निवड थांबलेली आहे.

निवृत्त सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडण्यासाठी आयुक्तांच्या स्वाक्षरीने महासभेकडे प्रस्ताव पाठवला जातो. या निवडीसाठी निवृत्त झालेल्या सदस्यांच्या पक्षांचा गटनेता आपल्या पक्षांतील सदस्यांच्या नावाची शिफारस करतात. यानंतर त्यावर महासभेत मंजुरी देऊन निवड केली जाते. 

प्रभाग क्रमांक सहा "अ'मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव निवडून आल्याने भाजपचे संख्याबळ एकने वाढणार आहे, तर शिवसेनेचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. त्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जोर धरला आहे. महापालिका सत्तेत भाजपला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात बसपला दोन वर्षे स्थायी समिती सभापतिपद देण्याचा निर्णय झाला होता. निवृत्त झालेल्या आठ सदस्यांत शेख यांच्या नावाची चिठ्ठी न निघाल्याने त्यांचे पद अबाधित राहिले आहे. 

महापालिका आयुक्‍तांचा या प्रशासकीय पेचप्रसंगावर निर्णय झाल्यानंतरच मी स्थायी समितीच्या नवीन सदस्य निवडीसंदर्भातील महासभा बोलावेल. प्रशासनाचे पत्र मिळाल्यानंतर तत्काळ महासभा बोलावली जाईल. 
- बाबासाहेब वाकळे, महापौर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com