चर्चा अहमदाबादच्या त्या 'मिनी बसची'... कशासाठी ते वाचा...

 Discussion of that 'mini bus' from Ahmedabad
Discussion of that 'mini bus' from Ahmedabad
Updated on

लेंगरे (जि सांगली) : लॉंकडाऊनमुळे ठिकठिकाणी गलाई व्यावसायिकांना, स्थालंतरीत मजुर, विद्यार्थी, पर्यटक यांना अटी शर्ती घालून मुळ गावी जाण्यास परवानगी दिली आहे.परंतू यामुळे गावी येणाऱ्या लोकांना कोरोनाचा संसर्ग सोबत घेऊन येतील का काय अशी भिती असताना अहमदाबाद गुजरात येथून आलेली ती बस कोरोनाबस बनली आहे.

या बसमधून आलेल्या साळसिंगे (ता. खानापूर) येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आल्याने इतर तीन तालुकेही कोरोनाच्या छत्रछायेखाली आले आहेत. शासनाची रितसर परवानगी घेऊन अहमदाबाद येथे व्यावसायनिमित्त स्थायिक असलेल्या आसपासच्या तालुक्‍यातील लोकांना एकत्रित करुन मिनीबस मधून सतरा लोकांनी प्रवास केला. गावी आल्यानंतर ग्राम स्तरीय व्यवस्थापन समितीकडून गावात दाखल झालेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले.

मात्र अहमदाबाद मधून आलेल्या महिलेस कोरोनांची लक्षणे दिसल्याने ग्रामीण रुगणालयात दाखल केल्यानंतर कोरोनाचा रिपोर्ट पॉंझिटीव्ह आल्याने सांळशिंगेसह प्रशासन चांगलेच हादरले. यानंतर प्रशासनाकडून या महिलेच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करुन त्यांची स्वॅंब तपासणीनंतर या महिलेच्या संपर्कात तीन तालुक्‍यातील तीन कोरोना बाधित झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.त्यामुळे या सतरा लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे सध्या परिसरात भागात त्या कोरोना बसची चर्चा आहे. 

अभिजीत चौधरी यांनी सांळशिंगे कंटमेन्ट,बफर झोन करुन गावाच्या सर्व सिमा सिल केल्याने सांळशिंगेत लॉंकडाऊन लागू करण्यात आला आहे.खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी शंकर बर्गे,तहसीलदार ऋषीकेत शेळके,तालुका आरोग्य अधिकारी डॉं.अनिल लोखंडे,पोलिस निरिक्षक रविंद्र शेळके यांनी भेट देवून दक्षता घेऊन, प्रशासन सहकार्य करावे असे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why are Sangli gram panchayat funds stalled?
Chandoli Sanctuary wildlife attack protest
Ramdas Athawale receives highway protest memorandum
Wildlife Adapts to Rising Temperatures
Marathi News Esakal
www.esakal.com