पैजा लागल्या..  तुमचा काय अंदाज राव...!

सचिन निकम
Sunday, 17 January 2021

सध्या सोशल मीडियावरून ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाचा सर्व्हे ग्रामीण भागातील पारावरच्या कट्ट्यावरील गप्पांत सध्या निकाल काय असेल, कोण निवडून येईल यांचे तर्कविर्तक लावून चर्चा रंगू लागल्या आहेत.

लेंगरे (जि. सांगली) : सध्या सोशल मीडियावरून ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाचा सर्व्हे ग्रामीण भागातील पारावरच्या कट्ट्यावरील गप्पांत सध्या निकाल काय असेल, कोण निवडून येईल यांचे तर्कविर्तक लावून चर्चा रंगू लागल्या आहेत. आमचा उमेदवार कसा निवडून येईल किती मताधिक्‍य किती असेल या आकडेवारी याची जुळवा कशी असेल. कोण कुणाला डोईजड बाबर गट की पाटील गट अशी समीकरणे पहावयास मिळत आहेत. 

लेंगरे परिसरातील देविखिंडी, नागेवाडी, माहुली, भिकवडी ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीत वार्डातील उमेदवारांनी आमचे पॅनेल गावच्या विकासासाठी कसे सरस आहे. हे पटवून दिले मात्र त्यांचे मुद्दे मतदारांच्या पचनी कितपत पडले आहेत. हे सोमवारच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. काही गावांतील गावपुढारी, उमेदवारांनी वैयक्तिक टीका सोडून इतर कोणताही विकासाचा मुद्दा लोकांच्या समोर मांडला नाही.

त्यामुळे मतदान करावे का नाही प्रश्न लोकांना पडला. मात्र प्रशासनाने प्रभावीपणे जनजागृती केल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी उमेदवारांचे भवितव्य असलेल्या पेट्या स्ट्रॉगरूम बंद केल्या खऱ्या मात्र त्या बंद पेटीतील मतांचा लेखा जोखा मांडण्यास सुरवात केली आहे. आपलाच उमेदवार कसा निवडून येईल याच्या दररोज एक अंदाज कार्यकर्ते व्यक्त करण्यात दंग आहेत.

सोशल मीडियावरील सर्व्हेमुळे तर अखेरचे टोक गाठण्यास सुरवात केली आहे. सोशल मीडियावरील सर्व्हे, राजकारणातील तज्ज्ञ लोकांनी काढलेल्या सर्व्हे यावरून आपला नेता कसा निवडून येईल असे ठामपणे पटवून सांगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

पैजा लागल्या.. 
ग्रामपंचायत निवडणुकीत वार्डात कोणता उमेदवार निवडून येईल याच्यावर पैजा लागण्यास सुरवात झाली आहे. ग्रामीण भागातून तर वार्डात कोणता उमेदवार सरस आहे. त्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळेल याचा आकडेवारीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र निवडणुकीचा निकाल अठरा तारखेला जाहीर होणार असून तो पर्यंत कार्यकर्त्यांना वाट पहावी लागणार आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussions on the outcome of the Gram Panchayat