
नगर - कोरोना नावाचा राक्षस दिवसेंदिवस एकेक शहर व एकेक देश गिळंकृत करीत आहे. नगरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. सरकारने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीचा आदेश लागू केला आहे.
आनंदाची बाब अशी की आता पर्यंत केवळ तीनच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील तिघेही ठणठणीत आहेत. त्यातील पहिल्या रूग्णाचा अहवाल निगेटीव आला आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारसह महानगरपालिकेचे नगरसेवक सरसावले आहेत. त्यांनी आपापला प्रभाग निर्जंतुकीकरण करण्यास सुरूवात केली आहे. काहीजण पदरमोड करीत लोकांसाठी हे काम करीत आहेत. काल प्रभाग दोनमध्ये नगरसेवक रूपाली वारे, सुनील त्र्यंबके, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार यांनी फवारणी केली.
बोरूडे मळा, सुडके मळा, हॉस्पिटल गिते, बागडे मळा, लोटस कॉलनी, जाधव मळा, लेंडकर मळा व वार्डातील संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली. माजी उपमहापौर अनिलभाऊ बोरुडे, नगरसेवक शाम (आप्पा ) किसन नळकांडे, तसेच नवग्रह प्रतिष्ठानचे रामभाऊ नळकांडे, अमोल बनकर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहीम राबवण्यात आली.
या कामासाठी शेतकरी शेख तसेच त्र्यंबके यांनी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला. बोरूडे हे मोबाईल नगरसेवक म्हणून ओखळले जातात. तसेच नळकांडे बंधू यांचीही ओळख सामाजिक कार्यकर्ते अशीच आहे. त्यांनी नावाप्रमाणेच प्रभागातील नागरिकांसाठी ही निर्जंतुकीकरण मोहीम राबवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.