काल रविवार सुटीचा दिवस असल्याने भावे नाट्यगृहात लावणी शोचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शो सुरू झाला. गाणी सुरू झाल्यानंतर आठच्या सुमाराम दोन गटांत वाद सुरू झाला.
सांगली : कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीनगरीत आयोजित करण्यात आलेल्या लावणी शोमध्ये (Lavani Show) दोन गटात राडा झाला. एकाने भावे नाट्य मंदिराचा फलकाची तोडफोड केली. संतप्त शौकिनांनी चांगलाच चोप दिला. अखेर हा वाद शहर पोलिस ठाण्यात आला. त्यानंतर भरपाई देण्याच्या अटीवर वादावर पडला, मात्र याबाबत कोणतीही नोंद शहर पोलिस ठाण्यात (Sangli City Police Station) करण्यात आली नाही.