वाळव्यात या अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत सत्ताधाऱ्यांत नाराजी 

naraji.jpg
naraji.jpg
Updated on

वाळवा (सांगली)- येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संपत माळी यांच्या कामकाजाबाबत सत्ताधारी गटात कमालीचा असंतोष आहे. त्या पार्श्‍वभुमीवर श्री. माळी यांच्या बदलीसाठी सत्ताधारी गट आता सक्रीय झाला आहे. गावात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. गावाचा काही भाग कंटेन्मेंट आणि बफर झोन म्हणून निश्‍चित केला आहे. अशा परिस्थितीत ग्रामविकास अधिकारी कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याची सत्ताधारी गटाची तक्रार आहे. 


गेल्या चार दिवसात आपत्ती व्यवस्थापन समितीच्या दोन बैठका झाल्या. या बैठकांना ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून ग्रामविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती गरजेची होती. मात्र ते केवळ औपचारिकता म्हणून उपस्थित राहिल्याची सत्ताधारी गटाची तक्रार आहे. कोरोनाच्या संकटात गावात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

ग्रामपंचायत, महसूल विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पोलिस या यंत्रणा समन्वयाने गावात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून झटत आहेत. ग्रामविकास अधिकारी मात्र आपल्या जबाबदारीतून बाजूला रहात असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाला सत्ताधारी गट कंटाळला आहे. त्यामुळे आता या गटाने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 


"" आणिबाणीच्या परिस्थितीत ग्रामविकास अधिकाऱ्यांना जबाबदारीचे भान नसेल तर त्यांनी स्वतःहुन बदली करुन घ्यावी. त्यांच्या कामाची पध्दत चुकीची आहे.'' 
- सरपंच डॉ. शुभांगी माळी 
----- 
"स्वत: बदलीसाठी इच्छुक आहे. साडेचार वर्षे वाळव्यात कार्यरत असून मला बदलीचे भय नाही." 
- संपत माळी, गटविकास अधिकारी, वाळवा.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com