रोपे वाटून उत्तर कार्य 

WNT20A00160
WNT20A00160

वारणावती (सांगली) ः चरण (ता. शिराळा) येथील पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब नायकवडी यांनी भावाच्या उत्तर कार्य विधीवेळी पाहुण्यांना रोपांची भेट दिली आणि पर्यावरण संवर्धनचा संदेश दिला. नायकवडी यांनी आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे नातेवाईकांनी कौतुक केले. 


चरण (ता. शिराळा) येथील नायकवडी कुटुंबीय हे पंचक्रोशीतील सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असणारे कुटुंब. स्वातंत्र्य चळवळीपासून आजही नायकवडी कुटुंबीय चळवळीत सहभागी होत आहेत. 


पद्‌मभूषण कांतिवीर डॉ. नागनाथआणा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब नायकवडी यांनी सामाजिक, राजकीय, धरणग्रस्तांच्या चळवळीत मोठे व दीर्घकाळ काम केले आहे. त्याच नायकवडी कुटुंबातील कारभारी म्हणून परिचित असलेले बाबूराव नायकवडी यांचे चार मे रोजी 78 व्या वर्षी निधन झाले. डोंगरी भागातील लोकांना त्यांच्या निधनाने शोक अनावर झाला. त्यांच्या रक्षाविसर्जनावेळी चिमुटभरही रक्षा विसर्जित करू न अस्थी नदीत न सोडता रक्षा "कारभारी' यांनी मातीत परिश्रम घेतले. संसाराचा गाडा चालवला त्या मातीतच विसर्जिन करण्यात आल. त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून झाडांना रक्षा अर्पण करण्यात आली.


दरम्यान, उत्तर कार्यात पाहुण्यांना भेट म्हणून भांड्याची किंवा अन्य वस्तू देण्याची पध्दत आहे. त्याऐवजी पर्था परंपरा बनलेल्या गोष्टींना फाटा देऊन नायकवडी कुटुंबातील बाळासाहेब यांनी रोपे वाटप करून एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवला. भावाच्या मृत्यूनंतर त्यांचे नाव नातेवाईकांत कायम स्मरणात राहील. या उपक्रमाबद्दल त्यांचे व कुटुंबियांचे कौतुक होत आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com