esakal | कणेगावच्या पुनर्वसनात जिल्हाधिकारी लक्ष घालणार...संघर्ष समितीला आश्‍वासन : राजू शेट्‌टींच्या उपस्थितीत बैठक 
sakal

बोलून बातमी शोधा

kanegaon meeting.jpg

सांगली-  वाळवा तालुक्‍यातील कणेगावच्या पुनर्वसनाच्या प्रश्‍नात लक्ष घालण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. कणेगाव पुनर्वसन संघर्ष समितीने आज माजी खासदार राजू शेट्‌टींच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. 

कणेगावच्या पुनर्वसनात जिल्हाधिकारी लक्ष घालणार...संघर्ष समितीला आश्‍वासन : राजू शेट्‌टींच्या उपस्थितीत बैठक 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली-  वाळवा तालुक्‍यातील कणेगावच्या पुनर्वसनाच्या प्रश्‍नात लक्ष घालण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. कणेगाव पुनर्वसन संघर्ष समितीने आज माजी खासदार राजू शेट्‌टींच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. 

कणेगाव येथील पुनर्वसनासाठी पैसे घेऊन वाटप केलेल्या प्लॉटचे पुन्हा नव्याने वाटप करण्याचा प्रशासनाने घाट घातला आहे. याला कणेगाव ग्रामस्थांचा विरोध आहे. कणेगावच्या पुनर्वसनासाठी 1989 मध्ये शासनाने निर्णय घेतला होता. 190 ग्रामस्थांना पुनर्वसनासाठी पुर्वी तीन गुंठ्यांचे प्लॉट देण्याचा निर्णय झाला. या यादीला प्रशासनानेही मंजुरी दिली आहे. पण अजून पुनर्वसनाचा प्रश्‍न रखडला आहे. आता प्रशासनाने तीन ऐवजी दीड गुंठ्यांचे प्लॉट देण्याचे नियोजन केले आहे. या निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. 

आज झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्‍नात लक्ष घालण्याची विनंती केली. पुनर्वसनासाठी ज्यांनी जमिनी दिल्या आहेत, ज्यांना पुर्वी जागा दिल्या आहेत आणि ज्यांचे कुटुंब मोठे आहे त्यांना पूरक जागा प्राधान्याने देण्यात यावी, तसेच ज्यांना जागा मिळाली नाही त्यांनाही तातडीने जागा देण्यात यावी अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या. 
माजी खासदार राजू शेट्‌टी म्हणाले, शेतकरी कुटुंबाला तीन गुंठे जागा द्यावी असा निर्णय विधानसभेत लक्षवेधी मांडून घेतला आहे. त्यानंतर 190 ग्रामस्थांच्या यादीला ग्रामसभेतही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यावर तातडीने कार्यवाही करावी. 
यावेळी कणेगाव पुनर्वसन संघर्ष समितीचे जगन्नाथ पाटील, विश्‍वास पाटील, दिग्विजय पाटील, शाहू पाटील, प्रकाश पवार, पंडित पाटील, हणमंत कांबळे, पंकज बनसोडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

loading image
go to top