
सांगली : राज्याच्या तिजोरीवर ताण असला, तरी ‘जिल्हा नियोजन’चा निधी शेवटच्या टप्प्यात शंभर टक्के हाती आला. जिल्ह्याला ४८६ कोटी रुपये मिळाले. पैकी ४८४ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ९८.५८ टक्के निधीचे वितरण झाले. मात्र सुमारे दोन कोटीचा निधी पोर्टल बंद पडल्याने माघारी गेला. अन्य निधी वितरित करण्यात यश आले, असे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.