
सांगली : जिल्ह्यातील हॉटेल्स, ढाब्यांवर बेकायदा मद्यविक्री आणि ग्राहकांना मद्य पिण्यासाठी सोय करून देणाऱ्या ढाबे चालकांवर राज्य उत्पादन शुल्कने छापे मारण्यास सुरुवात केली आहे. या छापेमारीत ११ हॉटेल मालक आणि २५ ग्राहक, अशा ३६ जणांवर कारवाई करण्यात आली.