या जिल्ह्यात यंदा उडीद, तुर पेरणीत झाली वाढ...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सांगली, ः जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस पुन्हा उघडीप आणि पुन्हा शेवटी पाऊस अशी स्थिती आहे. यंदा डाळीचे दर तेजीत असल्यामुळे डाळवर्गीय पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. उडीद आणि तुरीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी एक लाख 59 हजार 487 हेक्‍टरवर म्हणजे 57 टक्के झाली आहे. सर्वाधिक पेरा उडद, तुरीचा झाला आहे. सोयाबीन बीयाणांची उगवण क्षमता कमी असल्यामुळे केवळ 50 टक्के क्षेत्रावरत पेरणी झालेली आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सरासरी क्षेत्र 2 लाख 77 हजार 686 हेक्‍टर आहे. शिराळा तालुक्‍यातील भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्‍यात प्रामुख्याने उडीद आणि तुरीचे सर्वाधिक क्षेत्र असते. उडदाचे सरासरी क्षेत्र 2 हजार 51 हेक्‍टर आहे. यंदाच्या हंगामात 4 हजार 744 हेक्‍टरवर उडदाचा पेरा झाला आहे. तुरीचा पेरा 53 टक्के इतका झाला असून तुरीच्या क्षेत्रात वाढ होईल, अशी शक्‍यता आहे. दुष्काळी पट्ट्यात सूर्यफूलाची देखील लागवड केली जाते. परंतु, सूर्यफूलाची लागवड अवघे पाच टक्के झाली आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मुळात, पलूस तालुक्‍यात आगाप सोयाबीनची पेरणी होते. प्रामुख्याने वाळवा तालुका सोयाबीन उत्पादनासाठी अग्रेसर आहे. परंतु, गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे यंदा बियाण्यांची उपलब्धता कमी भासण्याची शक्‍यता होती. पण, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 86 हजार 560 हेक्‍टर असून हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या 50 टक्केच पेरा झाला आहे. सोयाबीन बियाणे उगवण कमी असल्यामुळे यंदा क्षेत्र घटल्याची शक्‍यता आहे. 

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र 
तालुका...क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
मिरज....5470 
जत...43888 
खानापूर...22449 
वाळवा...24915 
तासगाव....23060 
आटपाडी...4669 
कवठेमहांकाळ...10734 
पलूस...1999 
कडेगाव...10253 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In this district, there has been an increase in urad and tur sowing this year ...