
भंडी शेगाव : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेवांच्या पालख्यांसमवेत लाखोंनी वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. दसूरजवळ दुपारी चारच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांचे रथ शेजारी शेजारी थांबले. दोन्ही रथांतील मानकरी-विश्वस्तांनी एकमेकांना नारळ-प्रसाद दिले. पादुकांचे दर्शन घेतले. पादुकांच्या रूपाने झालेला या बंधुभेटीचा सोहळा लाखो वारकरी आपल्या डोळ्यांत साठवीत होते.