पश्चिम महाराष्ट्र
Diwali 2024: फटाके फोडाल तर दोन हजार रुपयांचा दंड; ७६ पुरस्कार पटकावलेल्या गावाची गोष्ट
Manyachiwadi Grampanchayat: ग्रामसभा ठरावाने फटाके वाजविण्यास बंदी घातली असून उल्लंघन केल्यास दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल.' असा सूचना फलक गावच्या प्रवेशद्वारावरच लावला आहे. सरपंच रवींद्र माने म्हणाले, 'फक्त दिवाळीपुरतेच नव्हे तर अन्य उत्सवात तसेच मिरवणुकीतही फटाके वाजविण्यास येथे बंदी आहे. मालदन पंचक्रोशीचे जागृत देवस्थान श्री वडजाईदेवीच्या मंदिरात लग्नानंतर वरातीने जोडपी दर्शनास येतात, मात्र फटाके वाजविले जात नाहीत.
ढेबेवाडी: माझी वसुंधरा अभियानातंर्गत एक कोटीचे बक्षीस पटकाविलेल्या राज्यातील पहिल्या सौरग्राम मान्याचीवाडी (ता.पाटण) येथे 'फटाके मुक्त गाव ' ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जात असून दिवाळीसह इतर सणोत्सवात अगर अन्य प्रसंगात फटाके वाजविल्यास दोन हजाराचा दंड संबंधितांकडून वसूल केला जात आहे.

